Mumbai fire : दादरमधील इमारतीला आग

 ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू 

मुंबई: मुंबईतील दादर दादर येथील हिंदू कॉलनी परिसरातील रेनट्री नामक १५ मजली रहिवासी इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीत डॉ. सचिन पाटकर (६०) यांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या दादर पूर्व भागात रेनट्री नामक १५ मजली रहिवासी इमारत आहे. या इमारतीच्या १३ व्या मजल्यावर अचानक आग लागली. या आगीत डॉ. सचिन पाटकर (वय ६०) यांचा गुदमरून मृत्यू झाला. पाटणकर हे मानसोपचारतज्ञ होते. त्यांच्यासोबत राहणाऱ्या दोघांना वाचवण्यास यश आले आहे. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. आगीचे लोळ दुरून दिसत होते. याची माहिती ताबडतोब अग्निशामक दलाला देण्यात आली.. अग्निशामक दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी १३ व्या मजल्यावर जात आगीवर नियंत्रण मिळवले आहे. 

या घटनेतील जखमी व्यक्तींना सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Post a Comment

Previous Post Next Post