Kdmc in action mode: रस्त्यावर अस्वच्छता पसरविणाऱ्यावर दंडात्मक कारवाई

कारवाईसाठी १२५ स्वच्छता मार्शल्सची नेमणूक 

डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण -डोंबिवली महानगरपालिकेने शहरात स्वच्छता राखण्यासाठी घाण पसरविणा-यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली असून लवकरच आता शहरात घाण घाण पसरवणाऱ्यावर दंडात्मक कारवाई होणार असून या साठी पालिकेने १२५ स्वच्छता मार्शल्सची नेमणूक करण्यात आली असून हे मार्शल कल्याण डोंबिवली परिसरात रस्त्यावरच कचरा टाकणे, थुंकणे, लघुशंका करणे, शौचास बसणे अशा प्रकारे शहर घाण करत करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत या बेशिस्त नागरिकांना शिस्त लावून शहर स्वच्छ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

   कल्याण -डोंबिवली महानगरपालिका सध्या स्वच्छतेसाठी मोठं मोठी यंत्रणा कार्यरत केले असले तरी नागरिक रस्त्यावरच कचरा टाकणे, थुंकणे, लघुशंका करणे, शौचास बसणे अशा प्रकारे शहर घाण पसरवत असल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे या बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी महानगर पालिकेनी कल्याण डोंबिवली परिसरात १२५ स्वच्छता मार्शल्सची नेमणूक केली असून हे मार्शल कल्याण- डोंबिवली परिसरात तैनात राहणार असून रस्त्यावर अस्वच्छता पसरवण्याऱ्या वेक्तीचा फोटो काढत त्याच्यावर ५०० रुपयापासून २५ हजारापर्यंतची दंडात्मक कारवाई करणार आहे यामुळे बेशिस्त नागरिकांना शिस्त लागणार असून शहर ही स्वच्छ राहणार त्याच बरोबर कारवाईचे ८० टक्के रक्कम ही पालिकेच्या तिजोरीत जाणार आहे यामुळे आपण रस्त्यावर थुकत असाल ,कचरा टाकत असाल किव्हा अस्वच्छता पसरवत असाल तर या मार्शल पासून सावधान रहा असेल आव्हान पालिकेकडून केले जात आहे.



Post a Comment

Previous Post Next Post