Germany ganpati festival: जर्मनीतील महाराष्ट्रीयन मंडळीकडून बाप्पाचे विसर्जन


पुण्याच्या रमणबाग ढोल ताशा मंडळाचा गजर

डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्रातच नव्हे तर देशाबाहेरही गणेशोत्सव साजरा होत असतो. देश सोडून चरितार्थासाठी दुसऱ्या देशात गेले आपल्या देशाची परंपरा, उत्सव, सण आनंदाने साजरे होत असताना दिसतात.गुडीपाढवा , गणेशोत्सव, नवरात्र उत्सव साजरे करताना अनेक भाविक एकत्र जमून रममाण होतात.यंदा जर्मनीत डूसल्डॉर्फ या शहरात मराठी मित्र मंडळाकडून पुण्याच्या रमणबाग ढोल ताशा  ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत दीड दिवस आणि पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला.

   जर्मनीमधील डूसल्डॉर्फ या शहरात मराठी मित्र मंडळातर्फे बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याच जल्लोषात बाप्पाचे विसर्जनही करण्यात येत आहे. मल्लखांबचे प्रयोग , लेझिमचा ताल , ढोल ताशांचा गजराने फ्रँकफर्ट शहर दुमदुमले. रस्त्यावर चालण्यासाठी जागा देखील नाही अशी माहिती मूळचे पुणेकर असणारे आणि सध्या फ्रँकफर्टला स्थायिक असलेले ललित कुळकर्णी आणि अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली.

   रमणबाग हा पुणेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय मग ती शाळा असो किंवा ढोल ताशा पथक पुणेकरांची पाऊले त्या रस्त्यावर काही क्षण का होईना रेंगाळतात. या क्षणांची आठवण कायम राहावी यासाठी मूळच्या पुणेकर असलेल्या काही ढोल ताशा पथकातील मंडळीनी तेथे वास्तव्य केले असले तरी रमण बाग या नावाने स्वतःचे ढोल ताशा पथक तयार केले आहे. त्यामुळे गणपती विसर्जनाला रमणबाग ढोल ताशा पथक सज्ज झाले आहे. पोलिसांची परवानगी काढून विसर्जन करणे सोयीचे जाते. सर्वच मराठी मित्र मंडळीना यामध्ये सहभागी होता येते. प्रसाद भालेराव यांनी या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती अंकुश काणे यांनी दिली.



Post a Comment

Previous Post Next Post