Kejriwal challenge to modi ...तर तुम्ही राजीनामा देणार का?

 केजरीवाल यांचे मोदींना खुले आव्हान

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थान नूतनीकरणाच्या खर्चात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत होता. या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी करणार आहे. सीबीआयमार्फत चौकशी सुरू केल्याने केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर केजरीवाल यांनी आधी देखील काही निष्पन्न झाले नाही आणि आता देखील काहीच निष्पन्न होणार नसल्याचे सांगितले. चौथी पास राजाकडून तुम्ही आणखी काय अपेक्षा ठेवणार? २४ तास हे फक्त चौकशीचा खेळ खेळतात किंवा भाषणं करतात. यांना इतर काही कामं नसल्याचे सांगत मागच्या वेळप्रमाणे यावेळीही काहीही निष्पन्न झाले नाही तर तुम्ही राजीनामा देणार का? असा प्रश्न विचारत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले आव्हान दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत, सीबीआय मार्फत अशा प्रकारे चौकशी होणे हे पंतप्रधान मोदींची भीती दर्शवणारे आहे असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. पहिल्यांदा कुठल्या तरी गोष्टींवरून चौकशी केली जाते आहे असे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाबरले आहेत, अशा प्रकारे त्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाची चौकशी करणे हे त्यांची भीती दाखवणारे असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

मे महिन्यात दिल्लीच्या नायब राज्यपालांनी सीबीआयला पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्याच बरोबरया संपूर्ण प्रकरणातील सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या होत्या. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले. गृह मंत्रालयाने मुख्यमंत्री निवासस्थान नूतनीकरण प्रकरणातील कथित घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याआधारे गृह मंत्रालयाने सीबीआय तपासाला परवानगी दिली. 

आत्तापर्यंत ५० पेक्षा जास्त वेळा आमची चौकशी करण्यात आली आहे. कधी सांगतात मद्य घोटाळा झाला. कधी सांगतात केजरीवाल यांनी बस घोटाळा झाला, कधी सांगतात शाळा प्रवेशात घोटाळा आहे, माझ्यावर आत्तापर्यंत ३३ पेक्षा जास्त केसेस करण्यात आल्या आहेत. त्यांना (मोदींना) वाटतं मी त्यांच्यासमोर गुडघे टेकेन. मात्र तसं कधीच होणार नाही. मी झुकणार नाही. ३३ प्रकरणात माझी चौकशी झाली, चौकश्यांमधून यांच्या हाती काही लागले नाही.

 दिल्लीचे मुख्मयंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मोदींचा उल्लेख चौथी पास राजा असा केला. आता यावर भाजपा आक्रमकपणे त्यांना उत्तर देण्याची शक्यता आहे. नेमकं पुढे काय काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post