Morbe dam overflow : मोरबे धरण १००% भरले

 


धरणातून १९.०८७ क्युबीक मीटर पाण्याचा विसर्ग

नवी मुंबई: नवी मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात यावर्षी जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. मात्र हा पाऊस मोरबे धरण भरू शकला नाही. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू झालेल्या पावसामुळे मोरबे धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली होती. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शनिवारी मध्यरात्री मोरबे धरण भरले. त्यानंतर १.३० च्या सुमारास मोरबे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून १९.०८७ क्युबीक मीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. 

ऐन गणेशोत्सवात नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. पालिकेने मोरबे धरण काही दिवसातच भरेल यासाठी धरणाचे वक्राकार दरवाजे उघडण्याची चाचपणीही घेतली होती. परंतु संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने मोरबे धरण भरणार का? असा प्रश्न मिर्माण झाला होता. सप्टेंबर महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती. काल एका दवसात १३२ मिमी पेक्षा अधिक पाऊस पडल्याने मोरबे धरण १०० टक्के भरले आहे. यंदा पावसाळ्यात मोरबे धरणात आतापर्यंत एकूण ३५४० मिमी. पावसाची नोंद झाली आहे. 

यंदाच्या पावसाळ्यात माथेरानच्या डोंगररांगामध्ये काही दिवसातच ५००० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. तर मोरबे धरण क्षेत्रात आतापर्यंत ३५४९ मिमी पाऊस पडला आहे. नवी मुंबई मोरबे धरण परिसरात जुलै महिन्यात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post