Rohit pawar in kalyan- dombiwali: शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पाडूनही भाजपची परिस्थिती सुधारली नाही: रोहित पवार

 

अजित दादा मोठे नेते आहेत, मी नेता बनण्यासाठी राजकारणात आलो नाही

प्रतिनिधी (शंकर जाधव) : अजित पवार गटाच्या नेत्यांकडून रोहित पवार यांना नेता बनायचे आहे, अशी टीका केली जातेय. या टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले रोहित पवार यांनी अजित दादा मोठे नेते आहेत, मी नेता बनण्यासाठी राजकारणात आलो नाही विचार जपण्यासाठी आलोय काही नेत्यांना तर वाटत असेल की मला नेता बनायचे तर मला नेता बनण्याची घाई नाही असा टोला लगावला.

कल्याण येथील स्प्रींग टाईम हॉलमध्ये इंडिया आघाडीच्या सभेचे आयोजन आज करण्यात आले होते. ढोल ताशा गजरात राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार यांचे ढोल ताशांच्या गजरात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी स्वागत करत सत्कार केला.

भाजपने केलेले सर्वेक्षणाचे रिपोर्ट हे भाजपची परिस्थिती ठिक नसल्याचे दाखवित आहे. त्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. त्यानंतरही भाजपची स्थिती सुधारत नाही. हे पाहता भाजपने शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला. सत्तेसाठी ही फोडाफोडी करुन देखील त्यांची परिस्थिती काही सुधारलेली नाही, अशी टीका रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे.

रोहित पवार यांनी मुंबई ते कल्याण लोकल ट्रेनने प्रवास केला. यावेळी त्यांनी नागरिकांशी देखील संवाद झाली साधला. याबाबत बोलताना रोहित पवार यांनी ठाणे जिल्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. त्यांचे चिरंजीव खासदार आहे. शिवाय या भागात भाजपचे खासदार केंद्रीय मंत्री आहेत. याठिकाणच्या जनतेशी गप्पा मारल्यावर कळाले की याठिकाणी विकास झालेला नाही. या भागात आराेग्याच्या वाहतूककोंडीच्या समस्या आहेत. महिलांवर हल्ले होतं आहेत. रस्ते खराब आहेत. विकास झालेला नाही, असं ते म्हणाले.









Post a Comment

Previous Post Next Post