भाजपने देशाची जाहीर माफी मागावी

इंडियाचे प्रवक्ते डॉ. जितेंद्र आव्हाड यांची मागणी

ठाणे: भाजपचे दिल्लीतील खासदार रमेश बिधुरी यांनी एका मुस्लीम खासदाराकडे बघून आक्षेपार्ह असे शब्दप्रयोग केले. ज्या लोकसभेला उज्ज्वल परंपरा आहे. त्या सभागृहात भाजपच्या खासदाराने असे असंसदीय शब्द वापरून सभागृहाची संस्कृती कलंकित केली आहे.

हा प्रकार धर्मनिरपेक्ष लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे भाजपने या प्रकरणी देशाची जाहीर माफी मागावी आणि लोकसभा अध्यक्षांनी, संसदेत असंसदीय शब्द वापरून सामाजिक अशांतता पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी इंडिया आघाडीचे प्रवक्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली.

बोलताना तारतम्य बाळगले जायचे. कधी कोणी असंसदीय शब्द वापरला तर माफी मागितली जायची. पण, या विशेष अधिवेशनाला कलंकित करणारा प्रकार काल भाजपचे दिल्लीतील खासदार रमेश बिधुरी यांनी केला आहे. त्यांनी आपल्या भाषणात आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यावेळेस भाजपचे ज्येष्ठ नेते खा. रविशंकर प्रसाद हे हसत होते. असे शब्द लोकसभेत वापरले जाऊच शकत नाहीत, असे लोकसभा

अभ्यासणारे, लोकसभेतील भाषणांवर विवेचन करणारे या सर्वांचे मत आहे. एकीकडे संविधानाच्या माध्यमातून जात व्यवस्था तोडण्यासाठी आपण मागे लागलो होतो. आता पुन्हा जातीव्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या लोकसभेला पंडीत नेहरू, बहुगुणा, फिरोज गांधी, लोहिया, दंडवते, बॅ. पै यांच्यासारख्या महान लोकांची परंपरा लाभली आहे. अशा वेळेत जर देशाला लोकसभेतून शिव्या ऐकाव्या लागत असतील तर या देशातील राजकारणाचा स्तर किती ढासळत आहे, हेच दिसून येत आहे, असेही ते म्हणाले. 

आतापर्यंत लोकसभेत सुसंस्कृत मुल्यांचे प्रदर्शन व्हायचे. पण, बोलताना तारतम्य बाळगले जायचे. कधी कोणी असंसदीय शब्द वापरला तर माफी मागितली जायची. पण, या विशेष अधिवेशनाला कलंकित करणारा प्रकार काल भाजपचे दिल्लीतील खासदार रमेश बिधुरी यांनी केला आहे, असेही ते म्हणाले.





Post a Comment

Previous Post Next Post