Bishan Singh Bedi Passed Away : बिशनसिंग बेदी यांचे निधन


मुंबई :  भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांचे निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. बेदी यांनी भारतासाठी एकूण ७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात त्यांनी २७३ विकेट घेतल्या. सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये बेदी यांची गणना केली जाते. बेदींनी भारताला अनेक सामने स्वबळावर जिंकवले आहेत. १९६७ ते १९७९ या बारा वर्षांच्या कालावधीत बेदी यांनी ६७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

बिशन सिंह बेदी १९७० च्या शतकात स्पिन गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी २२ टेस्ट सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून जबाबदार सांभाळली होती. बिशन सिंह बेदी याची भारतीय टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्तम स्पिनर्समध्ये गणना केली जायची. त्यांनी टीम इंडियासाठी ७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये त्यांनी २७३ बळी घेतले होते.

बिशन सिंह बेदी यांनी पंजाब संघाकडून क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. बिशन सिंह बेदी यांनी १९६८ साली  दिल्ली रणजी संघात पदार्पण केले. त्यानंतर ते अनेक वर्षे दिल्ली रणजी संघाचा भाग होते. बिशन सिंह बेदी यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. बिशन सिंह बेदी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द एका दशकाहून मोठी होती. त्यांनी सुमारे १२ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले.

 या ६७ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी २६६ विकेट्स घेतल्या होत्या. बेदी यांनी १० वन डे सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून सात फलंदाजांना माघारी धाडले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान फिरकी गोलंदाजांपैकी एक अशी बेदी यांची ओळख होती. भारताच्या बेदी, चंद्रशेखर, प्रसन्ना आणि वेंकटराघवन या फिरकी चौकडीची एका जमान्यात क्रिकेटविश्वात दहशत होती. १९६० आणि १९७०च्या दशकात बेदी यांच्या डावखुऱ्या फिरकी आक्रमणासमोर रथीमहारथी फलंदाजांची झालेली पंचाईत क्रिकेटविश्वाने पाहिली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post