Dhaka train accident: बांगलादेशमध्ये दोन रेल्वे गाड्यांची टक्कर

 २० जणांचा मृत्यू

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता 

ढाका : बांगलादेशमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास दोन रेल्वे गाड्यांची टक्कर होऊन अपघात झाला. या अपघातात कमीत कमी २० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे तर शेकडो प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक्सप्रेस ट्रेनला पाठीमागून आलेल्या मालगाडीने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

ढाकापासून जवळपास ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या भैरब स्टेशनजवळ एक मालगाडी पॅसेंजर ट्रेनला धडकली. सोमवारी सायंकाळच्या सुमारासगून आलेल्या मालगाडीने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. बांगलादेशी मीडियानुसार मृतांचा आकडा २० वर पोहोचला आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



भैरब रेल्वे पोलीस स्टेशन प्रभारी (ओसी) मोहम्मद आलिम हुसैन शिकदर यांनी सांगितले की, स्थानिक पोलीस अधिकारी सिराजुल इस्लाम यांनी सांगितले की, 'आतापर्यंत १२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मदतकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो.' ढाका शहराकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन ‘ईगारोसिन्दुर एक्सप्रेस गोधुली’ आणि किशोरगंजकडे जाणारी मालगाडी यांच्यात सोमवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास धडक झाली. 




Post a Comment

Previous Post Next Post