भोईर जिमखाना मधील जिमनॅस्टसची धडाकेदार बाजी

 


३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा  

डोंबिवली ( शंकर जाधव ) :   गोवाची राजधानी पणजी येथे पार पडलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये विविध राज्यांमधील १०००० खेळाडू सहभागी झाले होते. एकूण ४३ प्रकारच्या खेळांचा समावेश होता. ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक या खेळ प्रकारात भोईर जिमखान्याच्या आदर्श भोईर आणि राही पाखले यांनी सुवर्ण , सेजल जाधव हिने रौप्य आणि आयुष मुळ्ये याने कांस्य पदकं मिळवून डोंबिवलीतील भोईर जिमखाना व महाराष्ट्र राज्याचे नाव उंचावले. भोईर जिमखान्यातील प्रशिक्षक अनिता जाधव, नंदकिशोर तावडे, रविंद्र शिर्के तसेच भोईर जिमखान्याचे स्थापक आणि व्यवस्थापक मुकुंद भोईर आणि पवन भोईर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post