डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पश्चिमेकडील रेती बंदर रोडवर मंगळवारी बांधकामाजवळ ८ फुटी अजगर दिसल्याने नागरिक घाबरले होते.
नागरिकांनी पॉज हेल्पलाईनला कळविले असता बचावकर्ते रुषिकेश सुरसे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन ८ फूट लांबीच्या अजगराला पकडले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिक्षेत्र वन अधिकारी चेन्ने यांच्या मदतीने जंगलात सोडण्यात आले.