नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठी प्रायोगिक तत्वावर फेरीवाला क्षेत्र संकल्पना राबवणार

 

पालिका आयुक्तांची संकल्पना

 डोंबिवली ( शंकर जाधव ) :  डोंबिवली शहरातील स्टेशन बाहेरील परिसराती फेरीवाला प्रश्न गंभीर बनला असून फेरीवाल्यांकडून नागरिकांना मारहाण झाल्याचे प्रकार घडले होते. याची दाखल घेत पालिका आयुक्त डॉ. इंदुमती जाखड यांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले. नोंदणीकृत फेरीवाल्यांचे पुर्नवसन करण्यासाठी फेरीवाला धोरण समिती कागदावरच आहे का प्रश्न विचारला जात आहे. यावर पालिका आयुक्तांनी नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठी प्रायोगिक तत्वावर फेरीवाला क्षेत्र (मॉडेल वेंडिंग झोन ) संकल्पना राबवणार असल्याचे डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

    मंगळवारी डोंबिवली पूर्वेकडील नेहरू मैदान येथे विकास भारत संकल्पना यात्रा कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होत्या. फेरीवाला पुर्नवसन आणि फेरीवाल्यांकडून नागरिकांवर हल्ले याबाबत पत्रकारांनी विचारले असता पालिका आयुक्त म्हणाल्या, फेरीवाला धोरण समितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. दोन आठवड्यात हरकती प्रसिद्धीसाठी वेळ देणार असून त्यानुसार निकाली काढू.तसेच नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठी झोन निश्चित करून पुर्नवसन केले जाईल. नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठी प्रायोगिक तत्वावर फेरीवाला क्षेत्र (मॉडेल वेंडिंग झोन संकल्पना ) राबविणार असून त्यासाठी आरक्षित ठिकाणी झोन जाहीर केले जाईल. स्टेशन परिसरात पालिकेकडून कारवाई सुरूच असून नागरिकांवर हल्ले प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान यावेळी भाजप पदाधिकारी प्रकाश पवार यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईत सातत्य राहू अशी मागणी केली.


Post a Comment

Previous Post Next Post