२३वा ‘आयटीए’ पुरस्कार वितरण सोहळा
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘गुम है किसीके प्यार में’ मालिकेत सावीची भूमिका साकारणारी भाविका शर्मा यंदाच्या २३व्या ‘आयटीए’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच सहभागी झाली, तिने या सोहळ्यात ‘व्हॉट झुमका’ या गाण्यावर अफलातून नृत्य सादर केले. या रोमांचकारी अनुभवाबाबत तिने अधिक माहिती दिली.
इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी पुरस्कारांद्वारे दूरचित्रवाणी कलाकारांच्या विविध कलात्मक आणि रंजनासंदर्भातील कर्तृत्वावर मोहोर उमटते. दूरचित्रवाणी आणि चित्रपटांत बजावलेल्या उत्तम कामगिरीकरता प्रतिभावंत कलाकारांना ‘आयटीए’ पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. अलीकडेच १० डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याला मनोरंजन जगतातील बडे कलावंत आवर्जून उपस्थित होते. या सोहळ्यात हृतिक रोशन, राणी मुखर्जी, भूमी पेडणेकर, विजय वर्मा, शोभिता धुलिपाला या दिग्गज बॉलीवूड कलाकारांसह रूपाली गांगुली, हर्षद चोपडा, प्रणाली राठोड, सायली साळुंखे, विशाल आदित्य सिंग, शालिन भानोत, भाविका शर्मा, शक्ती अरोरा, विजयेंद्र कुमेरिया, हिमांशी पराशर, नवनीत मलिक, खुशी दुबे यांसारखी दूरचित्रवाणी कलावंतही सहभागी झाले होते. दर वर्षीप्रमाणे याही वर्षी मुक्त हस्ते खर्च केलेला हा सोहळा चमकदार आणि दिमाखदार होता.
या २३व्या इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी पुरस्कारांमध्ये दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांतून झळकणारे विविध सेलिब्रिटी कलाकार सहभागी झाले होते. त्यांनी या कार्यक्रमात सादर केलेली धमाकेदार नृत्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘गुम है किसीके प्यार में’ या मालिकेत सावीची भूमिका साकारणाऱ्या भाविका शर्मानेही या २३व्या ‘आयटीए’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात बहारदार नृत्य सादर केले. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील ‘व्हॉट झुमका’ या गाण्यावर सहकलाकार शक्ती अरोरा याच्यासोबत तिने वेधक नृत्य सादर केले. ‘स्टार प्लस’ वाहिनीवर हा सोहळा प्रसारित होणार असून या मंचावर आवडत्या जोडीने सादर केलेला परफॉर्मन्स पाहणे ही दूरचित्रवाणी प्रेक्षकांकरता एक दृक्-मेजवानी ठरेल.
या संदर्भात ‘स्टार प्लस’ वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ‘गुम है किसीके प्यार में’ या मालिकेमधील भाविका शर्मा ऊर्फ सावी म्हणते, “२३व्या ‘आयटीए’ पुरस्कार सोहळ्याबाबत मला खूपच उत्कंठा होती; या सोहळ्यात मी पहिल्यांदाच सहभागी होऊन माझे नृत्य पेश केले. पहिला परफॉर्मन्स हा कुठल्याही कलाकाराकरता नेहमीच खास असतो आणि त्यामुळे हा क्षण अर्थातच माझ्याकरता अमूल्य होता. मी माझा सहकलाकार शक्ती अरोरा याच्यासोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ हे गाणे सादर केले. मला आशा आहे की, प्रेक्षकांना आमचे सादरीकरण आवडेल आणि मी त्याबाबत अत्यंत उत्सुक आहे.
इंडियन टेलिव्हिजन अकॅडमीच्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम ‘स्टार प्लस’ वाहिनीवर ३१ डिसेंबरला संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होईल.