डोंबिवली ( शंकर जाधव ) : राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर शाळेमध्ये राष्ट्रीय गणित दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या सर्व शाखांमध्ये इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे गणित प्रदर्शन आयोजित करण्यात आले. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर शाळेत दत्तनगर प्राथमिकचे इयत्ता तिसरी ते सातवीचे ५० प्रकल्प इयत्ता पाचवी ते सातवी ४५ प्रकल्प मांडले होते. प्रत्येक गटातून प्रथम तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ क्रमांक निवडण्यात आले.
दत्तनगर शाळेच्या प्रांगणातच स्वामी विवेकानंद रामनगर प्राथमिक व दत्तनगर माध्यमिक च्या इयत्ता पाचवी ते सातवीचे प्रत्येकी १० प्रकल्प मांडण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षण नूतन ज्ञान मंदिर शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सुलभा परदेशी यांनी केले.
सदर कार्यक्रमास राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शास्त्री व संस्था कार्यकारणी सदस्य डॉ. सरोज कुलकर्णी दत्तनगर प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मुणगेकर, दत्तनगर माध्यमिकच्या बोंडे, रामनगर प्राथमिकच्या मुख्याध्यापिका लता मोरे उपस्थित होत्या.परीक्षानानंतर विजेता स्पर्धकांचे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले. डॉ. कुलकर्णी व परीक्षक माननीय परदेशी यांनी विद्यार्थ्यांना गणित प्रदर्शनाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे निवेदन रंजना मोरे यांनी केले. इयत्ता तिसरी चौथीचे गणित प्रदर्शनाचे परीक्षण संतोष पाटील व भरत तळवणेकर यांनी केले. गणित प्रदर्शन मांडणी व विद्यार्थी मार्गदर्शन यात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.