३१ व्या सब ज्युनियर आणि ४६ व्या वरिष्ठ राष्ट्रीय थ्रो बॉल चॅम्पियनशिपचे आयोजन



झारखंड येथील चांदिल येथे २४ राज्यातील संघाचा सहभाग
मुंबई: ३१ व्या सब ज्युनियर आणि ४६ व्या वरिष्ठ राष्ट्रीय थ्रोबॉल चॅम्पियनशिपचे आयोजन झारखंड राज्यातील चांदिलमध्ये करण्यात आले आहे. या स्पर्धेत २४ राज्यातील संघ सहभागी होणार आहेत. असोसिएशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्पर्धेदरम्यान २४ राज्यांतील १५०० पुरुष आणि महिला खेळाडू आणि अधिकारी सहभागी होणार आहेत. २७ ते २९ डिसेंबर रोजी या कालावधीत चंदिल पॉलिटेक्निक कॅम्पसमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. चांदिलसारख्या छोट्या शहरात राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ असेल. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

झारखंड राज्य थ्रोबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश गुप्ता यांनी याबाबत सांगितले की, ३५ वर्षांपूर्वी भारतीय थ्रोबॉल फेडरेशनने स्थापन केल्यापासून देशातील थ्रोबॉल चॅम्पियनशीप दरवर्षी लोकप्रिय होत आहे. ते म्हणाले की, या वर्षी सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना चमकदार करंडकांसह आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या संदर्भात थ्रोबॉल असोसिएशनचे सरायकेला-खरसावन जिल्हा सचिव आकाश कुमार दास यांनी सांगितले की, २६ डिसेंबरपासून खेळाडूंचे आगमन सुरू होईल. चांदिल पॉलिटेक्निक कॉलेज कॅम्पसमध्येच सर्वांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सेराईकेला-खरसावन जिल्हा थ्रोबॉल असोसिएशनचे सचिव आकाश कुमार दास यांनी सांगितले की, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंना झारखंडच्या कला आणि संस्कृतीची ओळख करून दिली जाईल. राज्यातील स्वादिष्ट पदार्थही खेळाडूंना देण्यात येणार आहेत. सरायकेला-खरसावन जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात असलेल्या सुंदर आणि धार्मिक स्थळांचाही दौरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या चांदिल धरण आणि दालमा वन्यजीव अभयारण्य याशिवाय जयदा मंदिर, अक्षरी मंदिर, दिउरी मंदिर यासह इतर ठिकाणी फेरफटका मारून त्यांचे महत्त्व समजावून सांगितले जाईल.

महाराष्ट्र संघ

सब ज्युनियर मुले
१) नाव मिहिर प्रशांत वीर २)  हार्दिक जयवंत ब्राम्हणे ३) अधिक कौस्तुभ सुनील ४) नाव तनिष्क महेश घाडगे ५) रोहन भगवान पाटील ६) रितेश रामविजय यादव ७) नाव साहिल विश्राम माने ८) ओम सुनील उपाध्याय ९) अक्षित उमेश जैस्वार १०) नाव अर्णव आशिष जगधने ११) मानस सुनीलकुमार सोनवणे १२) आर्यन प्रशांत म्हसे १३) नाव युवराज मोहन बलूनी १४) घनश्याम दया भुरिया १५) राज रामदास चौधरी.

सब ज्युनियर मुली 
१) मन्नत रोहिदास घरत, २) रिया सुरेश पुल्लानीपारंबिल ३) गौरी जयेश जाहेरी ४) मुबश्शिरीन शरीफ खान ५) अर्चना राम करण यादव ६) ज्ञानेश्वरी आनंद भोसले ७) सिद्धी विनायक बर्वे ८) अदिती संतोषकुमार मुनी ९) वैष्णवी संतोष सकपाळ १०) कनिष्का मिलिंद कांबळे ११) खुशी दिगंबर डोंगरे  १२) अन्वी हर्षद उधळीकर १३) समायरा सौरभ चॅटर्जी.

वरिष्ठ पुरुष संघ
 १) सिद्धेश अनिल पाटील २) मयुरेश लाडकू दिघे ३) अनुराग अखिलेश तिवारी ४ ) अंकुर अमित कांबळे ५ )आदित भगत सिंग
 ६) वैभव प्रकाश माळी ७) ओम अविनाश बाउस्कर ८) आयुष राजू पॉल ९) नीव अमित बंदरकर १०) श्लोक संजय गुप्ता ११) वैभव मोहन मोरे १२) नयन मोहन मोरे १३) गौरांग गणपत लिंगायत १४) मृणाल सुजित कालेवार १५) ओंकार सुधीर पांचाळ

 
महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक अरबाज शेख
व्यवस्थापक: राहुलकुमार वाणी
 संघ व्यवस्थापक: ए.पी. भीमराव
 संघ व्यवस्थापक देवयानी मोहपे

  


  

Post a Comment

Previous Post Next Post