मुंबई : नाताळ सणाच्या शाळांना सुट्ट्या लागल्याने तसेच सलग तीन दिवस सुट्ट्या मिळाल्याने नाताळात आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटनाला नागरिक बाहेर पडल्याचे चित्र महत्त्वाच्या एक्स्प्रेस महामार्गावर पहावयास मिळत आहे. यामुळे मुंबई पुणे- एक्सप्रेस मार्गावर मोठ्या प्रमाणात कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार आणि अवजड वाहने एकाच वेळी रस्त्यावर आल्याने ही कोंडी होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने पुढील तीन दिवस या मार्गाने प्रवास करतांना दुपारी बारानंतर अवजड आणि मोठ्या वाहनांनी दुपारी १२ नंतर प्रवास करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अनेक नागरीक गोव्याला जाण्यासाठी निघल्याने पुणे- सातारा महामार्गावर वाहतूककोंडी झाली आहे. ही शक्यता पुणे -मुंबई एक्सप्रेसवर देखील आहे. दरवर्षी नववर्ष आणि नाताळ मनिमित्त लोणावळ्यात सुट्टीसाठी नागरीक येत असतात. तीन दिवस सलग सुट्टी आल्याने या मार्गावर वाहनांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाटांमधील वाहतूककोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना घाट सुरू होण्यापूर्वी थांबविले जात आहे.
यावर्षी अवजड आणि जड वाहनांनी घाटामधून दुपारी बाराच्या नंतर प्रवास करावा असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आला आहे. यामुळे सकाळच्या सत्रात घाटामध्ये वाहतूककोंडी होणार नाही, चालकांचा वेळ वाचेल, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.