वृषाली शिंदे यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन

 

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदेंचा जय श्रीरामचा नारा

कल्याण ( शंकर जाधव ): अयोध्येत २२ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्र मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये असे आवाहन केल्यानंतर सर्वच राजकीय नेते आप आपल्या परिसरात नागरिकांना अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे दर्शन व्हावे यासाठी आपापल्या परिसरात आयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती साकारत आहे. 

अशाच प्रकारे कल्याण कोळशेवाडी परिसरात ही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून चक्की नाका परिसरात प्रभू श्रीरामाची भव्य असे मंदिराची प्रतिकृतीचे उभारली असून आज या प्रतिकृतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांची सून व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषालीताई श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला या वेळेस महिला व पुरुष कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळेस डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी रुशाली शिंदे यांनी प्रभू श्रीरामाचे कलश पूजा करत दर्शन घेत आयोध्या मध्ये ज्याप्रमाणेेे २२२ तारखेला दिवाळी आहे तशीच दिवाळी या ठिकाणी नागरिकाकडून साजरी होईल असा विश्वास व्यक्त केला.

त्या म्हणाल्या, कल्याण पूर्वेक जोरदार जल्लोष आहे सर्वांना आयोध्यात जाता येणार नाही त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिकृती मंदिर या ठिकाणी स्थापन केलेला आहे या परिसरातील सर्वच नागरिक या ठिकाणी आनंदाने २२ तारखेला एक प्रकारे या ठिकाणी दिवाळी साजरा करतील आयोध्यालाही त्याचप्रमाणे जोरदार प्रभू रामाचे प्राणप्रतिष्ठेचा उत्सव आहे इथेही त्याप्रमाणे नागरिक उत्सव साजरा करतील सर्वांनाच माझा जय श्रीराम असे सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post