नागरिकांना पेढे भरविले
डोंबिवली ( शंकर जाधव ): अयोध्येत प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठानंतर शिवसेनेकडून डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकातील ८० वर्ष पूर्ण झालेले श्री राम मारुती मंदिरात महाआरती करण्यात आली.यावेळी शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
आरतीनंतर शहरप्रमुख मोरे म्हणाले, या वेळेस श्रीप्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने स्वर्गीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.यावेळी सर्व शिवसैनिकांनी मंदिराच्या परिसरात 'जय जय श्री राम' नावघोषणा दणाणून गेला.