- ४० हून अधिक विकासक १५० हून अधिक प्रोजेक्ट
- ८ ते ११ फेब्रेवारीपर्यत १३ वे प्रॉपर्टी प्रदर्शन
- १६ लाखापासून ते १ कोटीपर्यंतची घरे
कल्याण ( शंकर जाधव ) : चाकरमान्यांना मुंबई व ठाणे येथे परवडणारी घरे मिळत नसल्याने त्यांची पाऊले कल्याण–डोंबिवली शहराकडे वळली.त्यासाठी रेरा रजिस्टरमधील सामान्यांना परवडणारी घरांसाठी एस.सी.एच.आयने पुढाकार घेतला. याची माहिती नागरिकांना मिळावी याकरता दरवर्षी एस.सी.एच.आय.कल्याण डोंबिवली युनिटच्या वतीने कल्याणात दरवर्षी प्रॉपर्टी प्रदर्शन भरविते. यावर्षी ८ ते ११ फेब्रेवारीपर्यत १३ वे प्रॉपर्टी प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष भरत छेडा यांनी कल्याणात पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत अध्यक्ष भरत छेडा, सचिव अरविंद वरक, एक्झीबिशन कमिटी सचिव सुनिल चव्हाण, प्रमुख सल्लागार तथा माजी अध्यक्ष रवि पाटील, संजय पाटील, साकेत तिवारी, जयेश तिवारी, दिनेश मेहता,राहुल कदम,विकास वीरकर, रोहित दीक्षित,राजेश गुप्ता,आदि उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष छेडा म्हणाले, या प्रदर्शनात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर ते ठाणे, शिळफाटा रोड परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे बघण्याची संधी कल्याण डोंबिवलीकरांना मिळणार आहे.
१६ लाखापासून सुरू होणारी आणि १ कोटीपर्यंत घरे प्रदर्शनात उपलब्ध असणार आहे. तर माजी अध्यक्ष रवी पाटील, सर्वसामान्यांना परवडतील अशी मनाजोगी घरे देण्याचा प्रयत्न क्रेडाई एस.सी.एच.आय. कल्याण डोंबिवली युनिटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे.या प्रदर्शनात ४० हुन अधिक विकासक १५० हुन अधिक प्रोजेक्ट सादर होणार आहे. दरवर्षी या प्रदर्शनाला २५ हजारहून अधिक नागरीक भेट देतात. या प्रदर्शनात सुप्रसिध्द अभिनेत्री शमिता शेट्टी भेट देणार आहे. या प्रदर्शनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर आणि पालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड व सुप्रसिध्द अभिनेत्री शमिता शेट्टी उपस्थित राहणार आहेत.