डोंबिवली ( शंकर जाधव ) : अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाल्याने डोंबिवलीतील ८० वर्ष पूर्ण झालेल्या श्रीराम मारुती मंदिरात मनसेकडून महाआरती करण्यातआली.यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख प्रकाश भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत, महिला शहर अध्यक्षा मंदा पाटील, माजी नगरसेविका कोमल पाटील,सरोज भोईर, सुदेश चुडनाईक यासह योगेश पाटील, अरुण जांभळे, संदीप ( रमा ) म्हात्रे, गणेश कदम, सुमेधा थत्ते, प्रमिला पाटील, विवेक भणगे, स्मिता भणगे,दीपिका पेढणेकर, प्रेम पाटील यासह अनेक पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित होते.यावेळी कल्याण जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर यांनी प्रभू श्रीरामांचे मंदिर होणे हे प्रत्येक भारतीयांचे स्वप्न होते आणि ते आज पूर्ण झाल्याचे सांगितले.