सलग सुट्टयांमुळे रायगड जिल्ह्यातील किनारे गजबजणार


अलिबाग / (धनंजय कवठेकर) :  सलग सुट्टयांमुळे कोकणचे समुद्र किनारे पुन्हा पर्यटकांनी गजबजणार आहेत. रायगड जिल्ह्यातील बहुतांश पर्यटन केंद्रांचे आरक्षण झाले आहे. मात्र मराठा आंदोलनामुळे कोकणाकडे येणाऱ्या पर्यटकांच्या वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांवर पोहोचायचे कसे याची चिंता पर्यटकांना पडली आहे. प्रजासत्ताक दिन आणि लागून आलेली शनिवार व रविवारची सुट्टी यामुळे पर्यटकांची पावले रायगडच्या किनाऱ्यांकडे वळली आहेत.अलिबाग, मुरूड, नागाव, काशिद, मांडवा, आवास, किहीम, दिवेआगर, श्रीवर्धन व हरिहरेश्वर येथील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजणार आहेत. तेथील पर्यटन केंद्रांवर मोठ्या प्रमाणात आरक्षण झाले आहे. तीन दिवसांत ३० ते ३५ हजार पर्यटक तेथे दाखल होण्याची शक्यता आहे. यासाठी पर्यटन व्यवसायिकांनीही जोरदार तयारी केली आहे. अलिबाग येथे चार दिवसीय पर्यटन महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे समर्थकांसह पुण्याहून नवी मुंबईकडे निघाले आहेत. त्यामुळे मुंबई आणि रायगडच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अलिबाग, मुरूड गाठायचे कसे, असा प्रश्न पर्यटकांना पडला आहे.


आरक्षणासाठी प्रचंड विचारणा होत आहे. पण रूम चायला शिल्लक नाहीत. आमच्या परिसरातील कॉटेज आणि रिसॉर्ट महिनाभरापासूनच आरक्षित झाली आहेत. पण येणारे पर्यटक मराठा आरक्षणामुळे वाहतुकीवर परिणाम होणार नाही ना याची सतत चौकशी करत आहेत. 

स्त्रोश देवले सर्टव्यवस्थापक, ऑलिनाम

सलग सुट्टयांमुळे पर्यटकांचा ओघ खूपच वाढला आहे. सगळ्या रूम आरक्षित झाल्या आहेत. पर्यटक २६ जानेवारीला सकाळपासून येणार आहेत. आमचे रिसोर्ट पुढील तीन दिवस पूर्णपणे आरक्षित आहे. 

ओंकार दळवी, व्यवसायिक, नागाव



 

Post a Comment

Previous Post Next Post