दिवा चंद्रागण रेसिडेन्सी येथे अयोध्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्त महाआरती संपन्न
दिवा/ (आरती मुळीक परब) : अयोध्या येथील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्त माजी आमदार सुभाष भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली दिवा चंद्रागण रेसिडेन्सी येथील श्री दत्त मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दिवा प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भजन, वारकरी संप्रदायच्या वतीने हरिपाठ तसेच सायंकाळी ७ वाजता ११०० दिव्यांचा भव्य दीपोत्सव तसेच माजी आमदार सुभाष भोईर यांनी भगवान श्रीरामांची सपत्नीक पूजा केली. त्यावेळी श्रीरामांच्या जय घोषात संपूर्ण परिसर राममय झाला होता. यावेळी सुमित सुभाष भोईर व भोईर कुटुंबीयांसह महाआरतीला मोठ्या प्रमाणावर रामभक्त, भाविक भक्तगण उपस्थित होते.