डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण – डोंबिवली शहरात अनेक विकास कामे सुरु आहेत. सर्व विकास कामे एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु आहेत. हि सर्व कामे पूर्णत्वास येत असून येत्या २६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या विकास कामांचे उद्घाटन केले जाणार आहे अशी माहिती युवा सेनेचे सचिव दिपेश म्हात्रे यांनी कल्याणात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
युवा सेनेचे सचिव दिपेश म्हात्रे यांनी कल्याण येथील पालिकेच्या मुख्यालयात आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांची भेट घेऊन विकास कामांबाबत भेट घेतली.त्यानंतर म्हात्रे यांना पत्रकारांनी विकास कामांबाबत चर्चेबाबत विचारले असता ते म्हणाले, कल्याण – डोंबिवलीत महानगरपपालिका हद्दीत एमएमआरडीएच्या माध्यमातून विकास कामे होत आहेत. रिंगरूट व मोठा गाव माणकोली उड्डाणपुल त्याच बरोबर स्वच्छता अभियान असेल अशी विविध विकास कामांचा धडाका सुरु आहे. जी कामे पूर्ण झाली त्या कामांचे उद्घाटन येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांसह अनेकपदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. डोंबिवलीतून ठाणे शहरापर्यतचा प्रवास सुखकर होण्यासाठी ठाणे महानगरपालिका द्वारे परिवहन सेवा उपलब्ध होणार आहे. याकरता पुलाजवळ इलेक्ट्रिक परिवहन बसेस डोंबिवली मोठा गाव ते ठाणे शहरातपर्यत धावतील. त्यांमुळे ठाणे ते डोंबिवली शहर प्रवास सुखकर होणार आहे असेही म्हात्रे यांनी सांगितले.