रंगरंगोटी करून सजविले मंदिर
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकातील श्री राम मारुती मंदिराची स्थापना १९४० साली झाली होती. या मंदिराची रंगरंगोटी व साफसफाईचे काम सुरू आहे. सह्यादी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते अनेक दिवसांपासून या कामात गुंतले असून २२ तारखेला या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सह्यादी समाजिक संस्थेचे अध्यक्ष नवनाथ मोरे, सचिव बाजीराव माने, उपाध्यक्ष समाधान लोकरे, सल्लागार भीमराव गुंड, धनाजी पवार, कल्याण डोंबिवली अध्यक्ष पोपट काळंगे, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रतिक साळवी, संस्थेचे प्रवक्ते रमेश माने, खजिनदार ज्ञानेश्वर भोसले, उपखजिनदार सुनील पाटील, ठाणे जिल्हा खजिनदार भरत राजगुरू, आरोग्य कमिटी अध्यक्ष तानाजी पाटील, महिला अध्यक्ष सुलेखा गटकळ, सदस्य संजय घारगे, हनुमंत पवार, प्रकाश सापरा, सदस्य रुपेश वाडावडेकर, अविनाश बुद्रुक, उमाकांत निंबाळकर श्रीमंत मासाळ, निवास कवडे, बालाजी जाधव, नीरज भोसले, सचिन आलदर आदींनी डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकातील श्री राम मारुती मंदिराची साफसफाई आणि रंगरंगोटी करीत आहेत.
याबाबत संस्थेचे अध्यक्ष नवनाथ मोरे म्हणाले, २२ तारखेला अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्त या मंदिराची संस्थेच्या वतीने रंगरंगोटी केली. तर मंदिराचे पुजारी दिनेश कुलकर्णी म्हणाले, २१ व २२ तारखेला विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. श्री गणेश मंदिरापासून निघणारी श्री रामाची पालखी या मंदिराला भेट देणार आहे. तर पुजारी प्रसाद आपटे म्हणाले, २२ तारखेला अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या वतीने मंदिरात जलधारा अभिषेक, रामनामजप आणि हवन, दोन भजनी मंडळ, संततधार अभिषेक व दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.