८६ कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग
डोंबिवली ( शंकर जाधव ) : रासायनिक व कापड उत्पादन कंपन्यात ज्वलनशील स्फोटक मिश्रणाच्या प्रज्वलनामुळे आग किंवा स्फोट होण्याचा धोका टाळण्यासाठी प्रशिक्षण कल्याण अंबरनाथ उत्पादक संघटना, परस्पर मदत प्रतिसाद गट आणि औद्योगिक संचालनालय सुरक्षितता आणि आरोग्य आयोजित यांच्या माध्यमातून डोंबिवलीतील कामा संघटना कार्यालयात एक दिवसीय कार्यशाळा सॉल्व्हेंट हँडलिंग करतांना इलेक्ट्रोस्टॅटिक धोका प्रशिक्षण शिबीर भरविले होते. यात ८६ कंपन्यांनी सहभाग घेतला.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय उपसंचालक लक्ष्मीकांत गोराणे मार्गदर्शनाखाली काम संघटनेचे अध्यक्ष राजू बैलूर, कार्याध्यक्ष डॉ. देवेन सोनी, घरडा केमिकलचे विकास पाटील आणि सदस्य बापजी चौधरी यांच्या उपस्थितीत क्लाॅथिक मनेजमेंट सिस्टम सर्व्हिस प्रमुख अविनाश काळे उपस्थित कंपन्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.याबाबत अधिक माहिती देताना कार्याध्यक्ष डॉ, देवेन सोनी म्हणाले, शिबिरात शून्य अपघाता करीता १०० टक्के आत्मविश्वास निर्माण करा तुमच्या संस्थेमध्ये अपघात / स्फोट न होण्यासाठी प्रशिक्षित टीमद्वारे इलेक्ट्रोस्टॅटिक ऑडिट कसे करावे याबद्दल मार्गदर्शन देण्यात आले. तर अविनाश काळे शिबिरात स्टाटिक धोक्यांबद्दल सावधगिरी, इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरनल ऑडिटची नवीन संकल्पना, 'केमिकल/फार्मास्युटिकल उद्योगांमध्ये इलेक्ट्रो-स्टॅटिक धोके आदींबाबत माहिती देण्यात आली. उद्योगांमध्ये सॉल्व्हेंट्स हाताळण्यासाठी आणि साठवण्यासाठी वापरत असल्यास, आग लागण्याचा धोका आणि स्फोट नेहमीच महत्त्वपूर्ण असतो. आपण 'इलेक्ट्रोस्टॅटिक धोक्यांची काळजी घेतली पाहिजे. स्थिर धोके दूर करण्यासाठी प्रशिक्षण हे एक शक्तिशाली साधन आहे असेही काळे यांनी यावेळी सांगितले.