थायलंडचा पराभव करत बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशीप स्पर्धेत विजेतेपद पटकावले
सेलानगर (मलेशिया) : भारतीय महिला बॅडमिंटन संघाने रविवारी मलेशियातील सेलानगरमध्ये इतिहास रचला. भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अटीतटीच्या लढतीत थायलंडचा ३-२ असा पराभव करत जेतेपद पटकााविले. क्रीडा इतिहासात कॉन्टिनेंटल टीम चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावण्याची भारताची पहिलीच वेळ आहे.
पीव्ही सिंधूने अंतिम सामन्यात शानदार सुरुवात केली. दुखापतीनंतर पहिली स्पर्धा खेळत असलेल्या पीव्ही सिंधूने अवघ्या ३९ मिनिटांत सुपनिंदा केथाचा २१-१२, २१-१२ असा पराभव करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर गायत्री गोपीचंद-जोली ट्रीसा या जोडीने तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत जोंगकोलफाम कित्तीथ्रकुल आणि रविंदा प्रजोंगजल यांचा पराभव करून भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. गोपीचंद-ट्रीसा यांनी पहिला गेम २१-१६ असा जिंकला, त्यानंतर दुसरा गेम १८-२१ असा गमावला. तिसऱ्या गेममध्ये गोपीचंद-ट्रीसा ६-११ ने पिछाडीवर होते, पण जोरदार पुनरागमन करत २१-१६ असा गेम जिंकला. अशाप्रकारे भारतीय जोडीने थायलंडच्या जोडीचा २१-१६, १८-२१ आणि २१-१६ अशा फरकाने पराभव केला. १६ वर्षीय अनमोल खरबने निर्णायक सामना जिंकून इतिहास रचला. जागतिक क्रमवारीत ४७२ व्या क्रमांकावर असलेल्या अनमोलने अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत ४५व्या स्थानावर असलेल्या पोर्नपिचा चोकिवाँगचा सरळ गेममध्ये पराभव करून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
पीव्ही सिंधू, गायत्री गोपीचंद-ट्रीसा जॉली आणि तरुण अनमोल खराब यांनी आपापले सामने जिंकून अंतिम फेरीत शाह आलममध्ये झालेल्याअंतिम फेरीत थायलंडचा ३-२ असा पराभव करत जेतेपद पटकाविले. थायलंडने देखील शानदार पुनरागमन केले. जपानविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अश्मिताने माजी विश्वविजेती नोजोमी ओकुहाराचा पराभव केला होता. मात्र दुहेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव पत्करावा लागला. थायलंडच्या बुसानन ओंगबामरांगने अश्मिता चालिहाचा ११-२१, १४-२१ असा पराभव करत जोरदार पुनरागमन केले होते.
भारताने प्रतिष्ठित थॉमस चषक जिंकल्यानंतर दोन वर्षांनी, महिला संघाने खंडीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत चीन, हाँगकाँग, जपान आणि थायलंडचा पराभव करत जेतेपद पटकाविले.