डोंबिवली ( शंकर जाधव ) : राष्ट्रवादी कॉंग्रस पार्टी डोंबिवली शहर आणि धर्मवीर आनंद दिघे हृद्यरोग उपचार केंद्र –मूत्रविकार उपचार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादीचे डोंबिवली विधानसभा शहरअध्यक्ष सुरेश जोशी यांची नात नक्षत्रा जोशी हिच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
डोंबिवली पश्चिमेकडील नवापाडा येथील गणेश नगरपरिसरातील शांताराम टाॅवर येथील आरोग्य शिबिरात सुरेश जोशी, डोंबिवली विधानसभा महिला अध्यक्ष सुनिता काटकर, डोंबिवली युवक विधानसभा अध्यक्ष शशिकांत म्हात्रे,डोंबिवली विधानसभा ओबीसी सेल शशिकांत म्हात्रे ( तांडेल ), डोंबिवली विधानसभा सेवादल अध्यक्ष सुखनदास राठोड, कार्याध्यक्ष सुनील फळदेसाई, डोंबिवली विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष कुणाल जोशी, जिल्हा सरचिटणीस रमेश दिनकर, मिलिंद भालेराव, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल उपाध्यक्ष गोवर्धन भोईर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश खलाटे, वॉड अध्यक्ष निमेश पाटील, भारत गायकवाड,वैष्णवी गावकर,निमकर, राठोड आदींश अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
याशिबिरात जनरल शस्त्रक्रिया, एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया, बायपास शस्त्रक्रिया, अपेंन्डीस शस्त्रक्रिया , मुतखडा शस्त्रक्रिया, कर्करोग शस्त्रक्रिया, व्हेरोकोज शस्त्रक्रिया, गुडघा बदलणे शस्त्रक्रिया, मुळव्याध शस्त्रक्रिया, क्रिटीकल केअर,मणक्याची शस्त्रक्रियाम कार्डियाक सर्जरी, जनरल मेडिसिन, युरो सर्जरी शस्त्रक्रिया, गायनंक शस्त्रक्रिया, न्युरोसर्जरीआदींचे पिवळी आणि केसरी रेशनकार्ड धारकांसाठी मोफत उपचार करण्यात येणार आहे. या रुग्णांना तपासणी करून माहिती देण्यात आली. या शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला.