डोंबिवली ( शंकर जाधव ) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे २३ व २४ तारखेला कल्याण – डोंबिवलीत येणार आहेत. गेल्यावर्षी राज ठाकरे यांनी डोंबिवली पूर्वेकडील सर्वेश सभागृहात पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले होते. तर काही महिन्यांपूर्वी अमित ठाकरे यांनीही डोंबिवलीत मनसैनिकांशी संवाद साधला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार असल्याचे मनसैनिकांनी त्यांच्या स्वागताची तयारी केली आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघ आणि भिवंडी लोकसभा मतदार संघाची चाचपणी करण्यासाठी राज ठाकरे येणार आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघातील डोंबिवली विधानसभा मतदार संघ आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील कल्याण पश्चिम येथे राज ठाकरे पदाधिकारी व मन्सैनिकांशी बोलणार बोलणार आहेत.