दिव्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा

 

दिवा, / ( आरती मुळीक परब) : दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दिवा मनसे कडून मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी नागरिकांना मराठी स्वाक्षरी करण्यासाठी प्रोत्साहीत केले.    

दिवा मनसेचे शहराध्यक्ष तुषार पाटील यांच्या संकल्पनेतून यावेळी दिव्यातील विविध 25 शाळा आणि महाविद्यालयांना राज्यगीताची प्रतिमा भेट म्हणून देण्याचा अनोखा उपक्रम यावेळी राबविण्यात आला. सर्व शाळांमध्ये जाऊन मनसे पदाधिकाऱ्यांनी राज्यगीताची प्रतिमा शाळांधील मुख्याध्यापकांना भेट म्हणून दिल्या. सोबतच दिवा रेल्वे स्थानक परिसरात मी मराठी,माझी स्वाक्षरी मराठी या मोहिमेतर्गत  मराठी स्वाक्षरी मोहीम गेल्या 7 ते 8 वर्षांपासून दिव्यात राबविली जाते. तर या वर्षीही दिवा महाराष्ट्र ननिर्माण सेनेकडून ही स्वाक्षरी मोहीम मोठ्या उत्साहात राबविण्यात आली. ज्याला दिव्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


Post a Comment

Previous Post Next Post