माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे शुक्रवारी निधन झाले. मुंबईतील रुग्णालयात शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  ते ८६ वर्षांचे होते. गुरुवारी हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनोहर जोशी हे कट्टर शिवसैनिक होते.

मनोहर जोशी हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते.मङ गेल्या वर्षी मे महिन्यात ब्रेन हॅमरेज झाल्याने याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनोहर जोशी १९९५ ते १९९९ पर्यंत मुख्यमंत्री होते आणि राज्यात सर्वोच्च पद भूषवणारे अविभाजित शिवसेनेचे पहिले नेते होते. ते खासदार म्हणूनही निवडून आले आणि २००२ ते २००४ या काळात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेवर असताना ते लोकसभेचे अध्यक्ष होते. 

मनोहर जोशी यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला. त्यांची परिस्थिती हलाखीची होती. मात्र, त्यांनी हार मानली नाही. सुरुवातीपासून संघर्षमय जीवन करत त्यांनी त्याचे शैक्षणिक आणि राजकीय करियर घडवले.  मनोहर जोशी यांनी मुंबई महानगर पालिकेची नोकरी सोडून बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत शिवसेनेचे काम सुरू केले. येथूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. १९७६-१९७७ काळात मुंबईचे महापौर होते. यानंतर त्यांचा राजकीय प्रवास हा भरभराटीचा राहिला. यानंतर शिवसेनेकडून त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. १९९०ते १९९१ मध्ये ते विधानपरिषदेवर आमदार झाले. या काळात ते बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते. यामुळे १९९५ मध्ये जेव्हा राज्यात युतीचे सरकार आले तेव्हा त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनवले. शिवाजी पार्कवर त्यांचा मोठा शपथविधी झाला होता. १९९९ ते २००२ केंद्रीय मंत्रिमंडळात मानव संसाधन विकास मंत्री म्हणूनही त्यांना जबाबदारी देण्यात आली. तर २००२ ते २००४ दरम्यान, त्यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. यानंतर २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

 

Post a Comment

Previous Post Next Post