मुंबई: लोकसभा निवडणूक होण्याआधीच महाराष्ट्रातून कॉंग्रेस
पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सोमवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केले आहे. काही काळापासून चव्हाण हे पक्षाच्या कामकाजावर नाराज होते. आता राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण हे कोणत्या पक्षात जातात हे पाहणे उत्सुकतेच ठरेल. चव्हाण यांनी सोमवारी मुंबईत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली.
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, मी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सभापतींकडे दिला आहे. मी काँग्रेस कार्यकारिणीचा आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कोणत्या पक्षात जायचे हे मी अजून ठरवलेले नाही. मी कोणत्याही पार्टीत गेल्यावर माझी भूमिका स्पष्ट करेन.
दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. विशेषत: ज्येष्ठ नेत्यांच्या वागणुकीमुळे काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले.