शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांची टीका
कल्याण ( शंकर जाधव ) : कल्याणमधील भाजपवर त्यांच्यावर इतका अत्याचार होत आहे. पद मिळाल्यानंतर गेल्या दोन वर्षात शिंदे पिता पुत्राकडून भाजपला संपविण्याचा प्रयत्न झालेला आहे. भाजपची अशी हालत होईल आणि ते सहन करतील हे मला कधीच वाटले नव्हते. मला इथल्या भाजप कार्यकत्याविषयी वाईट वाटते, अशी टीका शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केली.
उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी द्वारली येथील जागेच्या वादातून शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर युवा नेते ठाकरे यांनी कल्याण पूर्वेतील शिवसेना कोळसेवाडी शिवसेना शाखेला सायंकाळी भेट दिली. यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी त्यांचे जाेरदार स्वागत केले. ठाकरे भाषण ऐकण्यासाठी शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती.ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राचा हाच प्रॉब्लेम आहे. मुख्यमंत्री हे असे पहिले शेतकरी आहेत. जे लूनार शेती करतात. अमावश्या आणि पौर्णिमेला शेती करतात अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे यांनी केली आहे.