जागतिक मातृभाषा दिवस (world mother language day)
जगभरात २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरातील भाषा आणि संस्कृतिक विविधता जोपासणे आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाच्या उद्देश असतो. युनोस्को ने १७ नोव्हेंबर १९९९ रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्यासाठी घोषणा करण्यात आली आहे. मराठी, हिंदी आणि भारतीय भाषांबाबत बोलत असताना जागतिक स्तरावरही अनेक मातृभाषा आहेत या जगभरातील मातृभाषा जपल्या गेल्या पाहिजेत. यानिमित्ताने जागतिक मातृभाषा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाकडून हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वापराने जगभरातील अनेक मातृभाषा लोपपावत चालल्याचे चित्र दिसत आहे मात्र असं होऊ नये, यासाठी युनेस्कोने पुढाकार घेत मातृभाषा आणि त्याबरोबर संबंधित संस्कृती टिकावी यासाठी आजच्या दिवसाची निवड केली आहे. त्यामुळे आजचा दिवस जगभरात जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जात असतो.
जगात सुमारे ७ हजार भाषा बोलल्या जात असतात. आपल्या देशात प्रामुख्याने २२ भाषा बोलल्या जातात. आपल्या भारतात सुमारे १३०० च्या आसपास मातृभाषा आहेत. मातृभाषेबद्दल जागरूकता निर्माण करणे भाषिक विविधता जोपासणे याचे महत्त्व या निमित्ताने अधोरेखित होत असते. जगासह आपल्या देशात व राज्यात काही मातृभाषा लोप पावत असल्याबद्दलही जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जाते. मातृभाषेचे संवर्धन करणे मातृभाषेचा प्रचार प्रसार करण्याबाबत धोरण आखणे गरजेचे आहे. लहानपणी ज्या भाषेशी आपला परिचय होतो. ज्या भाषेच्या सानिध्यात आपण राहतो वाढतो त्या भाषेला मातृभाषा म्हणतात. युनायटेड नेशनच्या(UN) अहवालानुसार जगभरात बोलल्या जाणाऱ्या ६००० भाषांपैकी जवळपास २३८० भाषा म्हणजे ४३ % लुप्त होत आहेत लुप्त होण्याचे प्रमाण खूप जास्त आणि वेगवान आहे. प्रत्येक महिन्याला सरासरी दोन भाषा नाहीशा होत आहेत त्यामुळे प्रादेशिक सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. डिजिटल क्रांतीत मागे पडलेल्या छोट्या भाषा त्यांचे अस्तित्व वाचवू शकलेल्या नाहीत आज डिजिटल प्लॅटफॉर्मवर शंभरहून कमी भाषा वापरल्या जात असतात. आपल्या देशात १९५६९ भाषा बोलीभाषा म्हणून बोलल्या जातात. भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेल्या २२ भाषा देशातील ९३.७१% लोकांच्या मातृभाषा आहेत.
जसे की आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा मराठी तसेच आमच्या खानदेश विभागीय लोकांची मातृभाषा म्हणजे "अहिराणी" बोलीभाषा अहिराणी भाषा म्हणजे अभीर लोकांची भाषा असे समजले जाते. अभिरांची भाषा अभिराणी, अभीरचा अपभ्रंश अहिर आणि अभिराणीचा अपभ्रंश अहिराणी अभीर नावाचे लोक प्राचीन काळापासून खान्देशात राहत होते, असा उल्लेख अनेक ग्रंथातून व शिलालेखातून आढळून येतो. खान्देश हा मुळचा अभीर किंवा अहिर यांचा प्रदेश. अहिराणी धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक या चार जिल्ह्यात बोलली जात असली तरी तिचे बोलले जाणारे स्वरूप सर्वत्र सारखे आढळत नाही, धुळे हा अहिराणीचा केंद्रप्रदेश मानला जातो. नाशिक जिल्ह्यातील अहिराणी भाषेवर मराठीचा जास्त पगडा असून धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अहिराणी भाषेवर गुजरातीचा प्रभाव आढळतो. जळगाव जिल्ह्यातील अहिराणी भाषा वर्हाडी- वैदर्भी भाषेचा प्रभाव असल्याचे दिसून येते. खानदेशात राहणाऱ्या सर्वच लोकांची ही बोलीभाषा म्हणजे मातृभाषा आहे. आपल्या देशात राज्यात आपल्या मातृभाषेत बोलायला लोक सहसा टाळतात, दुर्लक्ष करतात हे खरंतर दुर्दैव म्हणावे लागेल. मातृभाषेत बोलले तर त्याला अडाणी संबोधले जात असते त्याच्या कौशल्याचा अवमान केला जात असतो.
आजच्या युगात इंग्रजी, हिंदी मानसिकतेने भाषेला सामाजिक स्थितीशी जोडले आहे जर आपण आपली मातृभाषा असलेल्या अहिराणी भाषेचे संवर्धन केले नाही तर भाषा मागे पडेल व भाषिक विविधता आपसुकत नाहीश होईल. आपल्या देशात मातृभाषा आणि असंख्य विद्यार्थ्यांची अभ्यासाची भाषा एक नसल्यामुळे शिक्षण घेणे अनेकदा आव्हानात्मक होते, मातृभाषेवर आधारित बहुभाषिक शिक्षणातून दर्जेदार शिक्षण मिळू शकते. यासाठी मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून होणे गरजेचे आहे म्हणजेच विद्यार्थी हसत खेळत शिकतील व शिक्षण त्याला ओझं वाटणार नाही. शिक्षण त्याला आपलस वाटेल मातृभाषा वाढवायची असेल टिकवायची असेल तर प्राथमिक शिक्षणाबरोबरच न्यायालयीन कामकाज आणि संबंधित निर्णयांमध्ये स्थानिक भाषा वापरण्याची गरज आहे. उच्च व तंत्र शिक्षणात स्थानिक भाषांचा वापर हळूहळू वाढणे हे देखील या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. प्रत्येकाने आपल्या अहिराणी असलेल्या मातृभाषेचा वापर आपल्या घरात अभिमान बाळगून केला पाहिजे...