मर्चंट पेमेंट्ससाठी पेमेंटला सर्वाधिक पसंती



(Paytm) पेटीएम ७६ टक्‍के वापरासह मर्चंट पेमेंट्समध्‍ये अग्रस्‍थानी

मुंबई: ७६ टक्‍क्यांहून अधिक मर्चंट्स व्‍यवहार करताना पेटीएम वापराला अधिक प्राधान्‍य देतात, हे डॅटमने नुकतेच केलेल्‍या सर्वेक्षणामधून निदर्शनास आले. भारतातील क्‍यूआर, साऊंडबॉक्‍स व मोबाइल पेमेंट्समध्‍ये अग्रणी असलेली आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी मर्चंट पेमेंट्ससाठी अव्‍वल पसंती म्‍हणून कायम आहे. 

आरबीआयच्‍या नुकतेच निर्णयाचा मर्चंट्सच्‍या पेमेंट्स स्‍वीकारण्‍याच्‍या पद्धतींवर वेगवेगळे परिणाम झाले. सर्वेक्षण करण्‍यात आलेल्‍या मर्चंट्सपैकी बहुतांश ५९ टक्‍के मर्चंट्सनी कोणतेही परिणाम न झाल्‍याचे सांगितले आणि पेटीएमचा वापर करत राहण्‍याची निवड केली आहे. 

या सर्वेक्षणामधून निदर्शनास आले की, ५८ टक्‍के मर्चंट्सनी पेटीएम ॲपला पसंती दिली, ज्‍यानंतर फोनपे (२३ टक्‍के), गुगल पे (१२ टक्‍के) आणि भारतपे (३ टक्के) यांचा क्रमांक होता. यामधून डिजिटल पेमेंट्समध्‍ये पेटीएमचे प्रभुत्‍व दिसून येते. सर्वेक्षण करण्‍यात आलेल्‍या मर्चंट्सपैकी ३९ टक्‍के मर्चंट्स पेमेंट्ससाठी पेटीएम साऊंडबॉक्‍सचा वापर करतात, तर ५ टक्‍के मर्चंट्सनी पेटीएम ॲपच्‍या माध्‍यमातून कर्ज घेतले आहेत. एकूण, मर्चंट्सवरील परिणाम मर्यादित आहे आणि पेटीएम कोणतेही नुकसान कमी करण्‍यासाठी त्‍यांच्‍याशी सक्रियपणे संलग्‍न आहे. या सर्वेक्षणामध्‍ये भारतातील १२ शहरांमधील पेमेंट्स स्‍वीकारण्‍यासाठी पेटीएम ॲपचा वापर करणाऱ्या २,००० मर्चंट्सचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post