दिव्यात सातारा जिल्हा रहिवासी संघाचा वर्धापनदिन उत्साहात

 

दिवा, (आरती मुळीक परब) : अजिंक्यतारा सेवा संस्था प्रणित सातारा जिल्हा रहिवासी संघदिवा शहर आयोजित प्रथम वर्धपान दिन मोठ्या उत्साहात दिव्यातील गणेश पाड्यात पार पडला. प्रसंगी सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकआजी माजी सैनिकमहिला आणि असंख्य बालगोपालांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला. प्रसंगी महिलांचे हळदी कुंकू समारंभ पार पडला. तर आजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. जेष्ठ नागरिक आणि विद्यार्थीचा गुणगौरव सोहळा ही मोठ्या उत्साहात पार पडला. प्रसंगी दिव्यातील विविध पक्षातील मान्यवर व सामाजिक संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवला.

शिवसेना दिवा शहरप्रमुख, उपमहापौर रमाकांत मढवीविभाग प्रमुख चरणदास म्हात्रे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच साताराचे ऐरोली विधानसभेचे विभागप्रमुख चंद्रकांत चाळके यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. प्रसंगी अक्षरा अकॅडमी व विद्यासागर क्लासेस यांचा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शाहीर प्रवीण फणसे यांच्या शाहिरी पोवाड्याने सर्व सातरकर व मान्यवरांची मन जिंकली. संस्थापक राम पवारअध्यक्ष संतोष फणसेकार्याध्यक्ष आदित्य कदमसचिव रामचंद्र पवार व इतर सदस्य व सभासद यांच्या उपस्थित कार्यक्रम उत्साहात पार पडला.


Post a Comment

Previous Post Next Post