आगामी निवडणुकांसाठी ३.४ लाख CAPF जवानांची मागणी

 


निवडणूक आयोगाचे गृहमंत्रालयाला पत्र

नवी दिल्ली,:  आगामी लोकसभा निवडणुका आणि आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीममधील विधानसभा निवडणुकांमध्ये टप्प्याटप्प्याने तैनात करण्यासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) ३.४ लाख जवानांची मागणी केली आहे.

 गृह मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात आयोगाने म्हटले आहे की, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची निवडणूक संबंधित कर्तव्ये जसे की मतदानाच्या दिवसाशी संबंधित कर्तव्ये, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची सुरक्षा (ईव्हीएम) आणि स्ट्राँग रूम सेंटर, मतमोजणी केंद्रांची सुरक्षा यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल CAPF तैनात करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

पत्रात आयोगाने म्हटले आहे की मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये CAPF च्या जास्तीत जास्त ३,४०० कंपन्या तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका CAPF कंपनीत अंदाजे १०० सैनिक असतात.





 



Post a Comment

Previous Post Next Post