पावणेआठ लाखांचा अवैध गुटखा जप्त

 


कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अबैध गुटखा वाहतूक करणाऱ्या तिघांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने बेड्या ठोकून अटक केली. या तिघांचे दोन साथीदार फरार असून यांनी हाजीमंलग रोड कुसवली गावाजवळ अवैध गुटखा कारखाना सुरू केला होता. पोलिसांनी या कारखान्यावर छापा टाकत पावणेआठ लाखांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन आणि गुटखा बनविणारी मशीन देखील जप्त करण्यात आली आहे.

   कल्याण गुन्हे अन्वेषण विभागात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त( गुन्हे )शिवराज पाटील यांनी माहिती दिली. विराज सिताराम आलीमकर (२४ के. सदन बंगला, शिळदिवा रोड, पारसिक बँकेच्या जवळ, शिळफाटा, जि. ठाणे , मोहम्मद उमर अब्दुल रेहमान (३५, रा. हिरा रेसिडन्सी समोरील चाळीत, खान कपांउड, मुंब्रा शिळ रोड, जि.ठाणे आणि मोहम्मद तारीक अलीकादर खान (२१, रा. हिरा रेसिडन्सी समोरील चाळीत, खान कपांउड, मुंब्रा शिळ रोड, जि. ठाणे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.


तिघांकडून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन व वाहनातील अवैध गुटखा असा एकूण ७,५८,१५० किमतीचा मुदद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या तिघांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२८, २७३, १८८ सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील कलम २६ (२), (I), कलम २७(१) सह वाचन ३(१) (zz) (IV), शिक्षा कलम ५९(३) तसेच २६ (२) (V) सह वाचन कलम ३० (२), (1) व मा.. अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांची अधिसुचना क्रमांक असुमाअ/अधिसुचना -५२४/७, दि१५/०७/२०२२ चे अधिसुचनेची अवज्ञा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    बदलापुर पाईपलाईन रोड, निसर्ग हॉटेल जवळ, खोणी फाटा डोबिवली पूर्व येथे चारचाकी वाहनाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अवैध गुटखा वाहतूक करून घेवून जाणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला. काही वेळाने बदलापुरच्या दिशेकडून काटईनाका दिशेकडे जाणारे एक चारचाकी वाहन थांबवून पोलिसांनी वाहन व गुटखा जप्त केला. पोलीस कस्टडी रिमांड घेऊन तपास केला असता हे तिघे व दोन साथीदार यांनी सुरू केलेल्या कल्याण येथील हाजीमंलग रोड कुसवली गावाजवळ अवैध गुटखा बनविण्याचा कारखान्यावर छापा मारला.

या कारखान्यातील अवैध गुटखा बनविण्याकरीता लागणारे साहित्य, २ मोठ्या मशीन व इतर कच्चा माल, सुंगधियुक्त सुपारी, विमल पान मसाला, राजनिवास पानमसाला तसेच जेड एल- ०१ जाफरानी जर्दा तंबाखु व इतर कच्चा माल असा सुमारे १७ लाख रुपये किमतीचा मुदद्देमाल जप्त करण्यात आला. 

   सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त गंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे ( गुन्हे शाखा ) ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोनि राहुल मस्के, सपोनि संदीप चव्हाण, सपोनि संतोष उगलमुगले, पोतपनि संजय माळी, पोहवा प्रशांत वानखेडे, पोहवा दत्ताराम भोसले, पोहवा बालाजी शिंदे, पोहवा विश्वास माने, पोह किशोर पाटील,पोहवा रमाकांत पाटील, पोहवा विलास कडू, पोहवा अनुप कामत, पोना सचिन वानखेडे, पोशि गुरुनाथ जरग, दिपक महाजन, पोशि गोरक्ष शेकडे, पोशि बिजेन्द्र नवसारे, पोशि रविन्द्र लांडगे, पोशि मिथुन राठोड,महिला पोलीस हवालदार मेघा जाने, मपोशि मंगला गावित, चालक पोहवा अमोल बोरकर यांनी केली.



Post a Comment

Previous Post Next Post