दिवा, (आरती मुळीक परब) / शिवसेना उबाठा, दिवा शहर आयोजित भगवा चषक अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा वॉर्ड क्रमांक २८ मधील उपविभाग प्रमुख अजित माने, संजय निकम यांनी आयोजित केली होती. या भगवा चषक अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत PM इलेव्हनला प्रथम पारितोषिक तर द्वितीय पारितोषिक साई स्टार इलेव्हन यांना आकर्षक चषक देण्यात आले. तसेच त्यावेळी मालिका वीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व सर्व सहभागी संघ यांना आकर्षक चषक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी विशेष उपस्थिती विशेष सहकार्य श्री साई श्रद्धा क्रिकेट संघ, शाखाप्रमुख अरविंद दिक्षित, उप शाखाप्रमुख संतोष सुर्वे, राजेन्द्र शिरसेकर, शिवसेना उबाठा युवासेना दिवा शहर अधिकारी अभिषेक ठाकुर, महिला उपशहर संघटिका प्रियंका सावंत, विभाग प्रमुख हेमंत नाईक, नागेश पवार, उपविभाग प्रमुख संभाजी जाधव, महेश खेतले, शाखाप्रमुख अनिल पवार, प्रतिक म्हात्रे, विलास मुळम, शशिकांत कदम होते. तर उप शाखा प्रमुख सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट खेळाडू शिवसैनिक, पदाधिकारी व मान्यवर यांच्या सहकार्याने खूप छान पध्दतीने या स्पर्धा पार पडल्या.