डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्वेकडील बीएसयुपी बिल्डींग, पाथर्डी रोडलगत, शेलार नाका येथे एक इसम देशी बनावटीचा कट्टा विकण्यासाठी आलेल्या आरोपीला बुधवारी २७ तारखेला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. आरोपीने एक देशी बनावटीचा गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस विनापरवाना बेकायदेेशीरित्या बाळगल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजु हरीराम तिवारी ( ५३, रा. रूम नं. ३०५, सिंधुदुर्ग अपार्टमेंट, मराठी शाळेजवळ, तळवली, नवी मुबंई ) असे अटक आरोपीचे नाव आहे. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागातील पोहवा दत्ताराम भोसले व पोशि गुरूनाथ जरग यांना माहिती मिळाली की डोंबिवली पुर्वच्या बीएसयुपी बिल्डींग, पाथर्डी रोडलगत, शेलार नाका येथे राजू हा देशी बनावटीचा कट्टा विक्री करण्याकरीता येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होता.व.पो.निरी. नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बीएसयुपी बिल्डींग, रोडलगत, शेलार नाका येथे पोलिसांनी सापळा रचला. दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास राजू या ठिकाणी येताच साध्या वेशातील पोलिसांनी झडप घालून त्याला बेड्या ठोकल्या.त्याच्याकडील विनापरवाना बेकायदेेशीररित्या एक देशी बनावटीचा कट्टा व एक जिवंत कााडतू हस्तगत केले. राजूविरोधात पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३. २५ व मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५ कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोनि राहुल मस्के, सपोनि संदिप चव्हाण पोहवा दत्ताराम भोसले, पोहवा विश्वास माने, पोहवा किशोर पाटील, पोना दिपक महाजन, पोशि गुरूनाथ जरग यांनी केली आहे.