श्रुविल सुशांत पवारचा वाढदिवस बाल संगोपन केंद्र व वृद्धाश्रमात साजरा

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) :  श्रुविल सुशांत पवार याचा पाचवा वाढदिवस पवार कुटुंबीयांनी डोंबिवली पश्चिमेकडील ओमकार साई बाल संगोपन केंद्र व वृद्धाश्रम येथे साजरा केला. श्रुविलने  आपल्या आई-वडिलांसोबत वाढदिवस साजरा करताना लहान मुलांना शालेय वस्तू आणि अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी पवार कुटुंबियांनी 

 सर्व मुलांबरोबर  मज्जा मस्ती आणि धम्माल  वाढदिवसाची गाणी  गाऊन  श्रुविलला  शुभेच्छा दिल्या.यावेळी सुशांत पवार,सोनल सावंत-पवार ,चंद्रकांत सावंत आणि सागर परब उपस्थित होते.यावेळी बालसंगोपन केंद्राच्या अध्यक्षा सुविधा दांडेकर म्हणाल्या, आपण वाढदिवस केंद्रात येऊन साजरा करतात.त्यामुळे आमच्या मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो मुलं आनंदी तर आम्ही आनंदी होतो.

Post a Comment

Previous Post Next Post