डोंबिवली ( शंकर जाधव) : डोंबिवलीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा डोंबिवलीकर महिला कीर्तनकारांनी रोविला आहे. डोंबिवलीकर प्राची गडकरी यांना महाराष्ट्र शासनाचा २०२२-२३ चा कीर्तन आणि संत साहित्याचा राज्य पुरस्कार मिळाला.जागतिक मराठी भाषा गौरव दिन, अशा गौरव दिनाचे औचित्य साधून शिवसेनेकडून प्राची गडकरींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
प्राचीताई गडकरी यांना शासनाचे १० पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असुन सन २०२३ चा हिरकणी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. प्राची गडकरी या महाराष्ट्र शासनाकडून गावगावात आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या महिला संतांची महती आपल्या कीर्तन आणि प्रवचनातून देत असतात. गेले अनेक वर्ष उत्कृष्ट निवेदनासह गौरव मूर्तींसाठी मानपत्र लिखाणाचे काम देखील करतात. गडकरी यांचे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शिवसेना युवासेना डोंबिवली शहर अधिकारी सागर जेधे, सचिन कस्तूर यांनी अभिनंदन केले.