शिवसेनेच्या नेत्यांसह नगरसेवकांचीही उपस्थिती
बदलापूर, : केंद्रीय राज्यमंत्री व भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी कुळगाव-बदलापूर शहरातील विविध रहिवाशी सोसायट्यांमधील सदस्यांबरोबर आज रविवारी संवाद साधला. या दौऱ्यात शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक व शिवसैनिकही सहभागी झाले होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहरांमध्ये रहिवाशी सोसायट्यांमध्ये पोचून थेट संवाद साधला जात आहे. त्यानुसार कुळगाव-बदलापूर शहरातील ज्युवेलीतील उषा किरण रेसिडन्सी, शिरगावमधील मोहन व्हिला, मॅरेथॉन नगरी, आपटेवाडीतील प्राची-स्वानंद सोसायटी, मोहन पाममधील नागरिकांबरोबर संवाद साधला. सोसायटीचे चेअरमन व पदाधिकाऱ्यांबरोबरही चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्याची माहिती दिल्यानंतर विकसित भारत घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचे आवाहन केले. बदलापूरमधील रहिवाशांच्या कायम पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली. बदलापूर रेल्वे स्टेशनमधील होम प्लॅटफॉर्म सुरू झाला असून, रेल्वे स्टेशनमध्ये लिफ्ट, एक्सलेटर, दोन प्रशस्त पादचारी पूल उभारले जात आहेत. भविष्यात रेल्वे स्टेशनजवळ उभे राहणारे पार्किंग प्लाझा, पाणीपुरवठ्यासाठी अमृत योजना, कॉंक्रीट रस्ते, सुंदर उद्याने आदी सुविधा पुरविण्यात आल्या असल्याकडे लक्ष वेधले.
या वेळी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, भाजपाचे पूर्व विभागाचे शहराध्यक्ष संजय भोईर, चेतन धुळे, मंगेश धुळे, श्रीधर पाटील, संजय गायकवाड, ज्ञानेश्वर घोरपडे, दिलीप बैकर, संदेश ढमढेरे, श्रीधर धुळे, मितेश धुळे, हरेश धुळे, वरूण म्हात्रे, अरुण पाटील, रोहिदास केणे, अंकुश भालेराव आदी उपस्थित होते.