अमरावती : रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी अखेर अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
आपण सुरुवातीला निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र असंख्य लोकांनी या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर काही नागरिकांनी आपण निवडणूक न लढविल्यास आत्मदहनाचा इशारा देखील दिल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी परिषदेत सांगितले. अखेर नागरिकांच्या आग्रहाखातर आपण पुन्हा अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत आपल्याला वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि इतर मित्र पक्षांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा देखील त्यांनी केला.