वाहतूक पोलिसांचा रिक्षाचालकांवर अन्याय

भाजप वाहतूक सेल जिल्हाअध्यक्षांचे पोलीस उपायुक्तांना पत्र 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली शहरात वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांचीही संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे.वाहतूक नियंत्रणावर लक्ष ठेवणे व वाहतूक कोंडी कमी करणे हे काम वाहतूक पोलिसांचे काम असते.मात्र रिक्षाचालकांवर अन्यायकारक वागणूक दिली जात असून वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. हातभर पोट असलेले रिक्षाचालक दंडात्मक कारवाईला कंटाळले असून यावर पोलीस उपआयुक्त ( वाहतूक नियंत्रण शाखा ) यांनी वेळीच यावर लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजप वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी दिला आहे.

       वाहतूक नियंत्रण करत असल्याचे दाखवत रिक्षांचा फोटो काढून त्या रिक्षाचालकावर दंडात्मक कारवाई सुरु आहे. एकीकडे बेरोजगारी वाढली असून शासनाने मुक्त परवाना दिल्याने डोंबिवली शहरात रिक्षांची संख्या वाढली आहे. दिवसभर रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाईने चिंता वाढली आहे.वाहतूक पोलीस निरीक्षक गिरीश बने हे रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाईवर भर देत असून त्याबाबत पोलीस उपयुक्तांनी लक्ष द्यावे अशी मागणी माळेकर यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post