सूर्यकांत माळकर यांची ग्वाही
डोंबिवली ( शंकर जाधव ) : भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर यांनी संपूर्ण प्रभागातील वॉर्ड फिरून बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, सुपर वॉरियर यांची भेट घेऊन ग्रामीण मंडळ अंतर्गत सर्व बुथ गठीत केली आहेत. प्रत्येक वार्डमधील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीसाठी काम करत आहेत. परंतु ज्या ठिकाणी बूथ गठीत झाले नाहीत त्या ठिकाणी कार्यकर्त्यांसमवेत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे आपकी बार ४०० पार या उद्देशाने डोंबिवली ग्रामीण मंडळ काम करत आहे.
कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये ग्रामीण मंडळातून एनडीएच्या उमेदवाराला सर्वाधिक पसंती मिळत असून मोठ्या प्रमाणात मतदान होईल त्याची खात्री मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर देत आहेत. ग्रामीण मंडळातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक महिला कार्यकर्त्या सर्व विभागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपकी बार ४०० पार हे लक्ष गाठण्यासाठी कल्याण लोकसभेसाठी जो खासदार म्हणून उमेदवार निवडणुकिसाठी त्याला नक्कीच मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार अशी ग्वाही मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत माळकर यांनी दिली.