जिल्हा रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी रुग्ण छाननी शिबीर



रायगड : रायगड मेडिकल असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीने पदभार हाती घेतल्यावर पहिल्या वहिल्या सामाजिक उपक्रमाला उत्साहाने सुरुवात केली.  "२०२४-२५ या कालावधीत जे आरोग्य विषयी विविध उपक्रम राबविले जातील त्यापैकी पहिला महत्वकांक्षी उपक्रम म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा रुग्णालयामध्ये होणारा प्लास्टिक सर्जरी कॅम्प. या कॅम्प मध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साधारणतः पन्नास रुग्णांवर तज्ञ व अनुभवी प्लास्टिक सर्जन्स मार्फत मोफत शस्त्रक्रिया केली जाईल", असे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निशिगंध आठवले म्हणाले.

"ज्येष्ठ प्लास्टिक सर्जन डॉ. नितीन मोकल, डॉ. स्वप्ना आठवले व त्यांचे सहकारी, स्वतः सिव्हिल सर्जन व अलिबाग येथील सर्जन्स, भुलतज्ञ, भिषक, बालरोगतज्ञ तसेच रायगड जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने होणाऱ्या या कॅम्प मध्ये भाजल्यानंतरचे व्रण, अतिरिक्त बोटं, जन्मतःच असणारी ओठातील भेग, जिभेखाली असणाऱ्या नसांच्या अडचणी, मस यासारख्या विविध विकारांवर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे", असे असोसिएशनचे कार्यवाह डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी नमूद केले.



"आरोग्याविषयी कोणत्याही मोठ्या कॅम्प मध्ये आयत्या वेळेस काही समस्या/अडचणी उद्भऊ नये म्हणून रुग्णांची फिटनेस छाननी होणं गरजेचं असतं आणि त्या धर्तीवर शनिवारी कॅम्पचे आयोजन करण्यात आयोजन आले होते  असं मत या उपक्रमाचे प्रमुख डॉ. नितीन मोकल यांनी मांडलं. डॉ. अद्वैत कुलकर्णी, डॉ. रविंद्र म्हात्रे, डॉ. एस. एन. तिवारी, डॉ. सचिन जायभाये, डॉ. प्रशांत जन्नावार, डॉ. अपूर्वा कुलकर्णी, डॉ. राजाराम हुलवान, डॉ. संदेश, डॉ. रश्मी भगत तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री.सुशील साईकर व रुग्णालयातील परिचारिका यांच्या सहकार्याने स्क्रिनिंग साठी बोलावलेल्या नव्वद पैकी पन्नास रुग्णांवर ३, ४ व ५ मे या कालावधीत शस्त्रक्रिया करणेस फिटनेस दिले गेले. 

या स्क्रिनिंग शिबिरात असोसिएशनचे पदाधिकारी अध्यक्ष डॉ. निशिगंध आठवले, कार्यवाह डॉ. राजेंद्र चांदोरकर व डॉ. नवलकिशोर साबू हे जातीने हजर होते. "मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या  प्लास्टिक सर्जरी शिबिरात अत्यंत गरजू रुग्णांच्या आरोग्य समस्यांना न्याय मिळेल", असे मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी व्यक्त केले.




Post a Comment

Previous Post Next Post