लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

 


 कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान अपघात 

डोंबिवली ( शंकर जाधव) : लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन एका २६ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी २९ तारखेला सकाळी आठ ते साडे आठ वाजण्याच्या सुमारास कोपर ते दिवा रेल्वे स्थानका दरम्यान घडली.या अपघाताची नोंद डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या महितीनुसार, रिया श्यामजी राजगोरे (२६) असे रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे. डोंबिवलीतील रिया मुंबईत  कामाला होती. नेहमीप्रमाणे तीने सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या लोकलध्ये चढली. मात्र लोकलमध्ये गर्दी असल्याने रियाने दरवाज्याजवळ उभे राहून प्रवास केला. कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रियाचा तोल जाऊन   खाली पडून मृत्यू झाला.२३ तारखेला डोंबिवलीतील अवधेश दुबे याचाही लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान मृत्यू झाला होता.

Post a Comment

Previous Post Next Post