रायगड लोकसभा मतदारसंघातून लढणार
अलिबाग, (धनंजय कवठेकर) : रायगड लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या वतीने सुनिल तटकरे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी सुनिल तटकरे यांच्या सोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आ. भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, माजी आमदार धेर्यशिल पाटील, उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांचा अर्ज स्वीकार केला.
सुनील तटकरे याचा उमेदवारी अर्ज भरण्याच्यापूर्वी महायुतीची सभा डिकेटी शाळेसमोरील मैदानावर झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पार्टी, नवनिर्माण सेना यांचे पदाधिकारी उपस्थित होते. आजच्या या सभेसाठी भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ, पालकमंत्री उदय सामंत, भाजप आ. रविंद्र पाटील आ. प्रशांत ठाकूर शिवसेना शिंदे गटा चे आ. भरत शेठ गोगावले आ. महेंद्र थोरवे आ. महेंद्र दळवी, आ. महेश बालदी, मंत्री अदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे, किरण सामंत, विनय नातू हे उपस्थित होते.
यावेळी अलिबागच्या आमदार महेंद्र दळवी महाडचे आमदार भरत गोगावले पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार धेर्यशील पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सुनील तटकरे यांना भरघोस मतांनी निवडून आणणार व युतीचा धर्म पाळणार असे सांगितले हसन मुश्रीफ, रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणामध्ये आजची झालेली गर्दी पाहून सुनील तटकरे यांचा विजय निश्चित असे सांगितले. यावेळी महायुती हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.