दिव्यात नववर्षानिमित्त श्री स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन



दिवा, (आरती मुळीक परब) : श्री स्वामी समर्थ सेवा, दिवा केंद्रातर्फे नववर्षानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गाचा (दिंडोरी प्रणित) प्रचार व प्रसार करण्यासाठी दिव्यातील सेवेकऱ्यांनी २०१२ साली एकत्रित येऊन श्री स्वामी समर्थ नागनाथ मंदिर, साबेगाव येथे दिवा साप्ताहिक केंद्र सुरू केले. दिवा केंद्रातर्फे साप्ताहिक आरती, मार्गदर्शन, बालसंस्कार, वैयक्तिक प्रश्नोत्तरे (विनामूल्य) असे अनेक उपक्रम राबविण्यात येतात.

 गुढीपाडव्याला गेली १२ वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज्यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या पालखी सोहळयात सर्व सेवेकरी आणि भाविक पांरपारिक वेशात सहभागी होऊन नववर्षाची सुरूवात श्री स्वामी समर्थाच्या शुभाशिर्वादाने करतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही गुढीपाडव्याचे औचित्य साधून दि. ९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थ नागनाथ मंदिर ते यशोदा बाळाराम पाटील नगर शिवमंदिर साबेपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post