कॅनडा : परदेशात भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांचे म्हणणे आहे की, कारमधून २४ वर्षीय चिराग अंतीलचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात स्थानिक लोकांनी गोळीबार झाल्याचा आवाज ऐकल्याचे म्हटले आहे. चिरागच्या कुटुंबीयांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान मोदींकडे मदतीचे आवाहन केले आहे.
२४ वर्षीय चिराग अंतिलचा मृतदेह त्याच्या ऑडी कारमधून सापडला आहे. आजूबाजूच्या लोकांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी चिरागची गोळ्या झाडून हत्या केल्याचे सांगितले. १२ एप्रिल रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गोळीबाराचा आवाज ऐकून स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. चिरागचा भाऊ रोमित सांगतो की, सकाळी जेव्हा चिरागशी शेवटचे बोलणे झाले तेव्हा तो खूप आनंदी दिसत होता. यानंतर चिराग आपल्या ऑडी कारमधून कुठेतरी जाण्यासाठी निघाला होता आणि त्यानंतर ही घटना घडली.
या प्रकरणी एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे तपासाला गती देण्याची आणि कुटुंबाला न्याय देण्याची विनंती केली आहे. या कठीण काळात मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात यावी, असे त्यांनी लिहिले आहे.
चिरागचे पार्थिव भारतात आणण्यासाठी त्याचे कुटुंब लोकांच्या मदतीने निधीची उभारणी करत आहे. त्याचा भाऊ रोमित अंतिल सांगतो की तो खूप दयाळू होता आणि त्याचे कोणाशीही वैर नव्हते. रोमितने सांगितले की, शेवटच्या वेळी जेव्हा तो चिरागशी बोलला तेव्हा त्याला खूप आनंद झाला आणि त्यानंतर त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली.
चिराग सप्टेंबर २०२२ मध्ये एमबीएचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी व्हँकुव्हरला गेला होता आणि अलीकडेच त्याला वर्क परमिटही मिळाले.